किसानपुत्र आंदोलनाचा आगामी कार्यक्रम
------------------------------ -----------------------
अमर हबीब
२२ नोव्हेंबर १६ रोजी पुण्याच्या गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे किसानपुत्रांचा राज्यस्तरीय मेळावा झाला. त्यात किसानपुत्र आंदोलनाच्या आगामी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
१) विषाद आणि निषेधाचे प्रतीक-
शेतकर्यांच्या आत्महत्यांना सहवेदना व्यक्त करण्यासाठी आपण काळी किनार असलेले पांढरे फडके वापरणार व ते ठिकठिकणी लावणार. सोशल मिडीयावरही त्याचा वापर करणार.
ज्या गावात शेतकर्याच्या आत्महत्या झाल्या त्या गावातील किसानपुत्रांनी आपल्या गावाच्या वेशीवर हा कृष्ण-धवल ध्वज लावायचा आहे.
पांढरा रंग वैधव्याचे प्रतीक मानला जातो. लाखो बहिणी विधवा झाल्या आहेत, त्यांच्या दुक्खाशी आपण आपले नाते पांढर्या रंगातून व्यक्त करणार आहोत. काळा रंग निषेधाचे प्रतीक आहे. शेतकरीविरोधी कायद्यांमुळे या आत्महत्या होत असल्याने त्याचा आपण निषेध करीत आहोत.
शेतकरीविरोधी कायदे जोपर्यंत रद्द केले जात नाहीत तोपर्यंत हे फडके फडकत राहतील.
२) राजकीय भूमिका-
येत्या जिल्हा परिषद व मंचायत समितीच्या निवडणुकीत,
किसानपुत्र आंदोलनात सहभागी झालेल़्या व भूमीपुत्र संघर्ष वाहिनीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना किसानपुत्र आंदोलनाचा पाठिंबा राहील.
किसानपुत्र आंदोलनात सहभागी झालेल़्या व भूमीपुत्र संघर्ष वाहिनीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना किसानपुत्र आंदोलनाचा पाठिंबा राहील.
शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावे या आंदोलनाला पाठिंबा देणार्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाची पुढील पाच जणांची समिती निर्णय करेल.
१) अच्युत गंगणे, २) अभिजीत फाळके, ३) गजानन अमदाबादकर, ३) सम्राट डोंगरदिवे, ४) प्रदीप पाटील, सांगली.
१) अच्युत गंगणे, २) अभिजीत फाळके, ३) गजानन अमदाबादकर, ३) सम्राट डोंगरदिवे, ४) प्रदीप पाटील, सांगली.
३) किसानपुत्र आंदोलनाची समन्वय समिती-
किसानपुत्र आंदोलनाची एक समन्वय समिती असेल. ती आगामी किसानपुत्र आंदोलनाचा समन्वय करेल.
या समितीत पुढील सदस्य राहतील.
अमर हबीब, अच्युत गंगणे, अभिजीत फाळके, अभिषेक अवचार, अनंत देशपांडे, अनंत काळे, अॅड, अनिल किलोर, अॅड, अनुप पात्रे, अनिरुद्ध चौसाळकर, डॉ. आशिष लोहे, अरूण यावलीकर, असलम सय्यद, अतुल कुडवे, अॅड. भूषण पाटील, ब्रह्मा चट्टे, गजानन अमदाबादकर, गोपाल चव्हाण, महेश भोसले, माणिक मुंडे, निखिल जैत, अॅड. निनाद पाटील, प्रदीप गुट्टे, प्रदीप पाटील अमरावती, प्रदीप पाटील सांगली, प्रकाश इंगोले, प्रमोद चुंचुवार, राहूल बोरसे, राजकुमार सस्तापुरे, प्रा. डॉ. राम चव्हाण, रवींद्र धनक, सम्राट डोंगरदिवे, संदीप मेहता, संजय सोनवणी, संतोष अरसोड, संतोष उमाटे, सतीश देशमुख, प्रा. डॉ. शैलजा बरूरे, अॅड. सुभाष खंडागळे, अॅड. दिनेश शर्मा, इस्माईल शेख,
किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही, ते एक आंदोलन आहे. हे आंदोलन सुसुत्र चालावे म्हणून वरील प्रमाणे समन्वय समिती निर्माण करण्यात आली. या समितीचा विस्तार होऊ शकतो.
४) पहिले प्रशिक्षण शिबीर-
किसानपुत्र आंदोलनाचे पहिले राज्यस्तरीय शिबीर येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे महात्मा गांधींच्या आश्रमात घेण्यात येईल.
या शिबीरीचा मुख्य विषय शेतकरी विरोधी कायदे हा राहील. त्याशिवाय किसानपुत्र आंदोलनाची वैचारिक भूमिका, रणनिती व कार्यपद्धती यावरही विचारमंथन केले जाईल.
हे शिबीर किमान ३ दिवसांचे होईल. प्रत्येकी खर्च किमान ११०० रुपये होईल. ८० लोकांनाच प्रवेश देता येईल.
किसानपुत्र आंदोलनाच्या समन्वय समितीचे सर्व सदस्य या शिबीरीला हजर रहतील.
किसानपुत्र आंदोलनाच्या समन्वय समितीचे सर्व सदस्य या शिबीरीला हजर रहतील.
५) कारभार्यांना निवेदन-
शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत या मागणीचे हिन्दी, इंग्रजी व मराठी भाषेतील निवेदन देशातील प्रधानमंत्री सह सर्व खासदार व महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांना दिले जाईल. यासाठी देशातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्यात येईल. याशिवाय काही महत्वाच्या लोकांना भेटून चर्चा केली जाईल.
या मागणीच्या मागे शक्ती उभी राहिल्याशिवाय त्याची कोणी दखल घेणार नाही याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे. तरी देखील लोकशाही व्यवस्थेची ही रीत आम्ही पार पाडणार आहोत.
६) आत्मक्लेशाचे वर्ष-
शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी किसानपुत्र आपापल्या ठिकाणी व आपापल्या पद्धतीने 'आत्मक्लेशा'चे कार्यक्रम करतील.
१) कमाल जमीन धारणा कायदा
२) आवश्यक वस्तूंचा कायदा
३) जमीन अधिग्रहण कायदा
हे तीन कायदे रद्द व्हावेत यासाठी हे आत्मक्लेश आंदोलन वर्षभर चालेल.
१) कमाल जमीन धारणा कायदा
२) आवश्यक वस्तूंचा कायदा
३) जमीन अधिग्रहण कायदा
हे तीन कायदे रद्द व्हावेत यासाठी हे आत्मक्लेश आंदोलन वर्षभर चालेल.
No comments:
Post a Comment